skip to Main Content

राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील  हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत. मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे ते पहिले आणि सर्वात तरुण मंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी एमएलसी केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचा भाजपच्या तिकिटावर २४००० मतांनी पराभव केला.

धाराशिव येथील कोल्हापूर बंधारे प्रकारातील सर्वात जास्त बंधारे (“के.टी.”) बांधण्यासात त्यांचे योगदान आहे. धाराशिवला अन्य मागास व मोठ्या प्रमाणात कोरडवाहू मराठवाडा भागातील सर्वात सिंचित जिल्हा बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उद्योग, महसूल, कृषी, सांस्कृतिक कार्य, रोजगार व रोजगार हमी योजना, संसदीय कार्य, जीएडी राज्यमंत्री होते. मंत्रीपदाच्या पहिल्या पदावर त्यांनी सहा विभागांची जबाबदारी सांभाळली आहे.

त्यांच्या कुटुंबीयांनी १९७८ ते २०१९ या काळात महाराष्ट्र विधानसभेत धाराशिव विधानसभेचे १० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील पद्मसिंह बाजीराव पाटील हे २० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र शासनात मंत्री होते. ते महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती, विरोधी पक्षनेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (एस) होते. तसेच ते गेल्या ४० वर्षांपासून धाराशिवचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची पत्नी धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.

आमचे प्रेरणास्थान : डॉ. पद्मसिंह बाजीराव पाटील

दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त कोल्हापुरी बंधारे डॉ.पद्मसिंह पाटील यांनी बांधले. त्यातून जिल्ह्यातील बहुतांश जमीन ही सिंचनाखाली आणली. त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे देखील एक राजकारणी असून तुळजापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

गेल्या ४५ वर्षांपासून जिल्ह्यात पाटील घराण्याचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायत, विविध सोसायट्या यावर पाटील घराण्याचा दबदबा राहिलेला आहे. आज देखील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनेलने विजय प्राप्त केलेले आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांचे नातू श्री.मल्हार पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असते. सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथला शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर १ वर्ष उशिराने जिल्हा स्वतंत्र झाला. एकत्रित जिल्हा असताना नेतृत्व लातूरकडे होते, त्यामुळे धाराशिवकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर चळवळीचे केंद्र, शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम यात उल्लेखनीय कार्य केलेल्या धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील ४ दशकांपासून अनेक बदल होत आहेत. जिल्ह्यात एक ही मोठी नदी नसताना, भौगोलिक रचनेमुळे सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलून मोठ्या परिश्रमाने जिल्ह्याचे रूप आकाराला आले आहे. त्यात डॉ.पद्मसिंह पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.

डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील १९७८ साली पहिल्यांदा मंत्री झाले. जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच जगण्याचा मुख्य आधार असल्याने त्यांनी सुरुवातीला शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. १९८८ साली त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याचा कारभार आला असता त्यांनी अल्प सिंचन सुविधा असल्याने जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी ज्यावेळी पदभार स्विकारला त्यावेळी जिल्ह्यात ५८ सिंचन प्रकल्प होते व जिल्ह्यातील केवळ ३२,३१५ एकर ओलिताखाली होती, त्यापैकी २००० हेक्टर वर फळबाग होती. १० वर्षे त्यांच्याकडे पाटबंधारे खाते होते. डॉक्टर साहेबांनी आपल्या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकरी बांधवांना करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाचा सर्वात जास्त निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी वापरला. अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत इतर मंत्री केवळ धाराशिव जिल्ह्यालाच पाटबंधारे खात्याचा सर्वात जास्त निधी खर्च केला जात असल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करत होते.

साहेबांनी केलेल्या प्रचंड कामामुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या ५८ वरून थेट १,२४८ वर गेली तर जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात ४% हुन २१ % पर्यंत लक्षणीय वाढ होऊ शकली. सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने ३६,०९,४३० एकर जमीन ओलिताखाली आली व फळबागा २००० हेक्टर हुन ३२,००० हेक्टरवर गेल्या. चांगला पाऊस झाला की, मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते व शेतकऱ्यांना सर्व शेती पिकांतून १००० कोटींहून अधिक रक्कम मिळते. उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने दुष्काळी म्हणून संबोधला जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात १६ साखर कारखाने झाले. समाधानकारक पर्जन्यमान असेल तेव्हा धाराशिव जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन होते.

सिंचन वाढल्यावर जिल्ह्यात सर्वदूर वीजेचे व रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्या स्वप्नाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून २००४ साली कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. भविष्यातील अनेक स्वप्नांची नांदी म्हणजे हा प्रकल्प होय. शेतीबरोबरच औद्योगिकीकरणाला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा अत्यंत आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरू केला. तब्बल २० किमी वळसा घालून रेल्वेमार्ग धाराशिव शहरा नजीक आणला. प्रचलित मार्ग सोडून एवढा मोठा वळसा घेऊन निर्माण झालेला हा रेल्वेमार्ग देशातील एकमेव उदाहरण आहे. स्वप्न वास्तवात आणण्यासाठी डॉ.साहेबांनी घेतलेले श्रम शब्दातीत आहेत.

धाराशिव शहराला पाणी मिळावे यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेणे, ग्रामीण भागातून शिक्षणाचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या सुविधा जिल्ह्यात मिळाव्या यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करणे असो की कृषी महाविद्यालय उभारणी असो याचे श्रेय विरोध देखील निर्विवादपणे डॉक्टर साहेबांनाच जाते.

धाराशिव-लातूर येथे झालेला भूकंप असो अथवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असोत मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सारं काही विसरून साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेले प्रयत्न आजही अनेकजण डोळ्यात पाणी साठवून सांगतात. मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याच्या ललाटावरील दुष्काळी फेऱ्याचा शिक्का पुसून टाकण्यात साहेबांनी आपल्या हयातीची ४० वर्षे खर्ची घातली आहेत.

सामाजिक योगदान

  • तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलांसाठी शिक्षणाची सोय
  • दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १ कोटीची मदत
  • अनेक शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन; २०१७ पासून ६७ मोठी वैद्यकीय शिबिरे घेऊन ६१३४७ रुग्णांची तपासणी करून निदान केले, तर ३९०६ रुग्णांवर निशुल्क उपचार व शस्त्रक्रिया करण्यात यश.
  • इतर रुग्णालयामधील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरघोस सहकार्य; उस्मानाबाद तालुक्यातील ४२ गावांमध्ये पशू वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून छोट्या शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतण व लसटोचणीचे मोफत आयोजन तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी टँकरद्वारे टंचाई काळात विनामूल्य पाणीपुरवठा केला.
  • महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ४५ गावांमध्ये ६००० महिलांसाठी शिवण क्लासेस द्वारे प्रशिक्षण.
  • उस्मानाबाद शहरासाठी महत्वाकांक्षी अशी उजनी धरणातून १०८ किमी अंतरावरून १८४ कोटी रुपयाची उजनी पाणी पुरवठा योजना सुरू केली.
  • रोजगार निर्मिती, कृषि सुधारणा, विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, रेशीम शेती-उद्योग, पॉलिहाऊस-शेडनेटच्या माध्यमातून फुलशेतीस प्रोत्साहन.
  • राज्यमंत्री असताना उस्मानाबाद शहरालगत कौडगाव येथे २५०० एकरवर औद्योगिक वसाहतीची स्थापना करून १५०० एकरचे भूसंपादन तसेच महाजनकोच्या ५० मे.वॅ. सोलार ऊर्जा निर्मिती प्रकल्पास मंजूरी मिळवून घेतली. उर्वरित भूसंपादन व उद्योग आणणेसाठी पाठपुरावा. २००८ साली उस्मानाबाद नगरपरिषद व राज्य शासनाच्या वतीने उस्मानाबाद महोत्सव २००८ चे आयोजन

राजकीय कार्यकाळ

  • २००४ – २००९ : कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
  • २००८ ते नोव्हेंबर २००९ : महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
  • २००५ ते २००८ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
  • २००८ ते २०१४ : सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद.
  • ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
  • २०१९ – तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवड.

राजकीय प्रवास

2019
2019

२०१९

२०१९
तुळजापूर विधानसभा मतदार संघातून निवड
2014
2014

ऑक्टोबर २०१४

ऑक्टोबर २०१४
महाराष्ट्र विधानसभेवर निवड
2008
2008

२००८ – २००९

२००८ – २००९
महसूल व पुनर्वसन, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, उद्योग व संसदीय कार्य खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
2008

२००८ ते २०१४

२००८ ते २०१४
सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद
2005
2005

२००५ ते २००८

२००५ ते २००८
सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद
2004
2004

२००४ – २००९

२००४ – २००९
कृषि, उद्योग, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगार हमी योजना खात्याचे राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

ⒸRanajagjitsinh Patil. All Rights Reserved.